अणु ऊर्जा विभाग Department of Atomic Energy

माननीय सचिव
अणु ऊर्जा विभाग

डॉ शेखर बसू
अणू शक्ती देशातील विकसित करण्यासाठी वापरले जाऊ शकते...
IAEA GC 2016 भाषण

अणु ऊर्जा विभाग बद्दल

राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दि ३ ऑगस्ट १९५४ रोजी पंतप्रधानांकडे थेट नियंत्रण असेल असा अणु ऊर्जा विभाग (DAE ) स्थापन करण्यात आला. अणुऊर्जा आयोगाच्या (AEC ) ठरावानुसार अणुऊर्जा विभागाचे सचिव भारत सरकार हे अणुऊर्जा आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील असे ठरविण्यात आले.

अणुऊर्जा विभाग खाली दिलेल्या संशोधन व विकास या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे
१. अणुऊर्जा व तंत्रज्ञान
२. शेतीविषयक तंत्रज्ञान
३. औषधे
४. उद्योग
५. मुलभुत संशोधन

अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत ५ संशोधन केंद्र, ३ औद्योगिक संघटना , ५ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि ३ सेवा क्षेत्रे यांचा समावेश आहे . अणुऊर्जा विभागाद्वारे उच्चस्थरीय गणित आण्विक व त्याच्याशी संबधीत क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या विद्यापीठांसाठी निधी देण्यात येतो तसेच हा विभाग मूलभूत विज्ञान, खगोलशास्त्र, खगोल भौतिक शास्त्र , कर्करोग संशोधन आणि शिक्षण संशोधनांत कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आठ संस्थांना समर्थन पुरवतो.
त्या विभागाअंतर्गत असलेले शिक्षणमंडळ विभागातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षिणिक सुविधा पुरविते.